तळोदा l प्रतिनिधी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नंदुरबार जिल्हा कार्यकारिणीची बैठक नंदुरबार शहरातील राजे शिवाजी हायस्कूलमध्ये घेण्यात आली बैठकीला प्रमुख मार्गदर्शक व निरीक्षक म्हणून राज्य सरचिटणीस विनायक सावळे व राज्य सोशल मीडिया कार्यवाह किर्तीवर्धन तायडे उपस्थित होते.बैठकीच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार शाखेचे उपाध्यक्ष शांतीलाल शिंदे होते.
बैठकीला जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील,जिल्हा प्रधान सचिव वसंत वळवी, नंदुरबार शाखा कार्याध्यक्ष सूर्यकांत आगळे,सचिव बलदेव वसईकर, तळोद्याचे शाखा सचिव अमोल पाटोळे,रमेश राऊत,शहाद्याचे शाखाध्यक्ष संतोष महाजन,सचिव श्रीकांत बाविस्कर,प्रदीप केदारे अक्कलकुवा शाखा कार्याध्यक्ष सुमित्रा वसावे,आदी सह जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत जिल्हा प्रधान सचिव वसंत वळवी यांनी नुकताच नागपूर येथे झालेल्या राज्य कार्यकारणी बैठकीच्या आढावा मांडला.त्यानंतर शाखा निहाय विविध उपक्रम व कार्यक्रम यांचा आढावा घेण्यात आला.बैठकीत नवीन शाखा बांधणी या विषयावर घटक चर्चा व नियोजन करण्यात आले.१ नोव्हेंबर रोजी डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या वाढदिवसानिमित्त ऑनलाईन ‘ आठवणीतले डॉ दाभोळकर’ हा कार्यक्रम घेण्याचे ठरवण्यात आले.
या कार्यक्रमात जिल्ह्यातील मान्यवर सहभागी होणार असून डॉ. नरेंद्र दाभोळकरांसोबतच्या आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे. बैठकीत डाकीण प्रश्न बाबत बैठकीत चर्चा करण्यात आली असून २४ नोव्हेंबर रोजी अस्तंबा यात्रेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नंदुरबार जिल्हा कार्यकारणीच्या वतीने डाकीण प्रथेवर व प्रबोधन केले जाणार आहे.
डिसेंबर महिन्यात चला व्यसनाला बदनाम करू या,हे अभियान तसेच २६ नोव्हेंबर ते २६ जानेवारी दरम्यान संविधान बांधिलकी महोत्सव अंतर्गत पोस्टर प्रदर्शन, चालता बोलता,संविधान पोस्टर प्रदर्शन,रॅली असे उपक्रम राबवण्याचे नियोजन करण्यात आले. ३ ते १२ जानेवारी दरम्यान महिला सबलीकरण अभियाना अंतर्गत महिलांमध्ये जनजागृती व महिलांचे अंधश्रद्धा निर्मूलन विषयक प्रशिक्षण घेण्याबाबत देखील या बैठकीत ठरवण्यात आले.
बैठकीच्या यशस्वी साठी नंदुरबार शाखेचे चंद्रमणी बर्डे,फिरोज खान, जितेंद्र खवळे,आदीसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले








