नंदुरबार | प्रतिनिधी
येथील जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी संगीता भरत गावित, समाज कल्याण सभापती शंकर आमशा पाडवी तसेच उर्वरित दोन विषय समिती सभापतीपदी शिवसेना (उबाठा) चे गणेश रूपसिंग पराडके व काँग्रेसच्या अरुण शितोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
दरम्यान काँग्रेस व बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या एकाही सदस्याने नामांकन दाखल केले नाही तसेच सभेलाही त्यांची अनुपस्थिती होती.
नंदूरबार जिल्हा परिषदेच्या सभापती पदासाठी आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सत्ताधारी व विरोधक यांनी अर्ज खरेदी केले होते.दरम्यान, काँग्रेस व बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या एकाही सदस्याने नामांकन दाखल केले नाही तसेच सभेलाही त्यांची अनुपस्थिती होती.
त्यामुळे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी संगीता भरत गावित, समाज कल्याण सभापती शंकर आमशा पाडवी तसेच उर्वरित दोन विषय समिती सभापतीपदी शिवसेना (उबाठा) चे गणेश रूपसिंग पराडके व काँग्रेसच्या हेमलता अरुण शितोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मात्र, सभापती पदासाठी शहादा येथील जयश्री दीपक पाटील व ऐश्वर्यादेवी रावल हे दोन्ही उमेदवार इच्छूक होते. माघारीच्या वेळेपर्यंत दोघांचीही मनधरणी नेत्यांकडून करण्यात येत होती. त्यामुळे ऐश्वर्या रावल व जयश्री पाटील यांनी माघार घेतली. परंतु नाराज झालेल्या जयश्री पाटील यांनी निवड सुरू असतानाच सभेतून काढता पाय घेतला.
तर ऐश्वर्या रावल या सभेला अनुपस्थित राहिल्या.विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन्ही सदस्यांना सभापती पदाची संधी मिळाली आहे.जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सह सभापती पदाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना संधी मिळाली आहे.