नंदुरबार प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हा परिषदेच्या चार सभापती पदासाठी आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी समाज कल्याण सभापती पदी उबाठा शिवसेनेचे शंकर आमश्या पाडवी, महिला बालकल्याण सभापती पदासाठी सौ.संगीता भरत गावीत, विषय सभापती पदासाठी उबाठा शिवसेनेचे गणेश रुपसिंग पराडके व काँग्रेसच्या हेमलता शितोळे बिनविरोध झाले आहेत.