Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

team by team
October 19, 2022
in राज्य
0
शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन
नंदुरबार :
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन 2022-2023 साठी नंदुरबार जिल्ह्यासाठी केळी, पपई, आंबा या फळपिंकाना लागू करण्यात आली असून या फळपिक विमा योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
नैसर्गिक आपत्ती व पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षण देणारी ही योजना आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असून सर्वसाधारणपणे ज्या महसूल मंडळात संबंधित फळपिकाखालील क्षेत्र 20 हेक्टरपेक्षा जास्त आहे. अशा अधिसूचित मंडळामध्ये सदर योजना राबविण्यात येते.यात सापेक्ष आर्द्रता,किमान तापमान व गारपीट इत्यादी हवामान धोक्यांपासून संरक्षण दिले जाणार आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेत हवामान धोक्याचे ट्रिगर कार्यान्वित झालेल्या महसूल मंडळातील त्या फळपिकासाठी सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे. नुकसान भरपाई महावेध प्रकल्पांतर्गत महसूल मंडळस्तरावरील स्वंयचलित हवामान केंद्राच्या आकडेवारीनुसार ठरविण्यात येते. यात गारपीट,वेगाने वारे यामुळे नुकसान झाल्यास 72 तासांच्या आत संबंधित विमा कंपनीस पूर्वसूचना द्यावी लागेल. त्यानंतर वैयक्तिक पंचनामा करुन नुकसान भरपाई अंतिम केली जाईल.
योजनेत समाविष्ट फळपिके, विमा संरक्षित रक्कम, शेतकऱ्यांना भरावयाचा पीक विमा दर पुढील प्रमाणे: केळी व आंबा फळपिकासाठी 1 लाख 40 हजार विमा संरक्षित असून शेतकऱ्यांना 7 हजार रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे. तर पपईसाठी 35 हजार विमा संरक्षित असून शेतकऱ्यांना 1 हजार 750 रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून ग्राहक सेवा क्रमांक 18001024088 असा आहे.
या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत केळी व पपई फळपिकासाठी 31 ऑक्टोंबर 2022 तर आंबा फळपिकासाठी अंतिम मुदत 31 डिसेंबर, 2022 आहे. पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज ऑनलाईन स्विकारण्यात येणार असून यासाठी जवळच्या कॉलम सर्व्हिस सेंटर अथवा आपले सरकार सेवा केंद्र, जनसुविधा केंद्र यांच्याशी संपर्क साधावा. तरी अधिकाधिक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

आदिवासींना रोजगार उपलब्ध करून स्थलांतराचा प्रश्न सोडवणार : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add