Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

team by team
October 19, 2022
in राज्य
0
शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन
नंदुरबार l प्रतिनिधी
कार्यकारी अभियंता,नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागी पथक यांच्या अधिपत्याखालील नंदुरबार जिल्ह्यातील  शिवण मध्यम प्रकल्प,नंदुरबार, नागन मध्यम प्रकल्प,नवापूर, कोरडी मध्यम प्रकल्प,नवापूर, लघूपाटबंधारे योजना रंकानाला, लघूपाटबंधारे योजना अमरावती नाला, ता.नंदुरबार, लघूपाटबंधारे योजना  सुसरी ता.शहादा, लघूपाटबंधारे योजना  मेंदीपाडा ता.नवापूर अधिसूचित नदी-नाले तसेच पाण्याचा फायदा घेणाऱ्या बागायतदारांनी सुरू झालेल्या रब्बी हंगाम 2022-2023 साठी 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत पाणी अर्ज सादर करायचे आहेत.
          सर्व बागायतदारांनी आपले नमुना नं. 7, 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात सादर करावेत. बागायतदारांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजूरी देण्यात येईल. बागायतदांरानी आपआपल्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात. पाणी अर्ज स्विकारण्याची मुदत पुरेशी देण्यात आली असून मुदतीनंतर आलेल्या पाणी अर्जाचे मंजुरी बाबत उपलब्ध पाणीसाठा व अगोदर आलेली मागणी विचारात घेवून नंतरच मंजूरी, ना मंजुरीचा विचार करण्यात येईल.
  मंजूरी व पाणी पुरवठ्याबाबत अन्नधान्ये, भुसार, चारा,डाळी, कपाशी, भुईमूंग व इतर हंगामी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रितसर पास मिळाल्याशिवाय पाणी घेऊ नये. थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी दरसाल दर शेकडा 10 टक्के जादा आकारासह भरणे आवश्यक आहे. पाणी नाश, पाळ्या नसताना पाणी घेणे, मंजुरीपेक्षा अधिक क्षेत्र भिजविणे, विहीरीवरील पिकास कालव्याचे पाणी घेणे, पाटमोट संबंध दूर न करणे आदी प्रकाराबाबत नियमानुसार पंचनामे करून दंडाच्या दराने आकारणी करण्यात येईल.
  टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पीक नुकसान भरपाई देता येणार नाही. पाणी अर्ज शाखा कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालयास देऊन पोहोच पावती घेण्यात यावी. शासनाने काही सवलती दिल्यास त्याबाबत कळविण्यात येईल.
लाभक्षेत्रातील तसेच कालव्यापासून 35 मीटर अंतराच्या हद्दीतील विहिरींबाबत नमुना 7 (ब) मागणी अर्ज न करता बिनअर्ज  क्षेत्र भिजविण्यात आल्यास प्रचलित नियमानुसार पंचनामे करण्यात येतील. हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पद्धतीने पाणी देण्यात येईल, असे  बी.बी. अहिरराव उपकार्यकारी अभियंता नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक,नंदुरबार यांनी कळविले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर

Next Post

शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

Next Post
शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add