शहादा l
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा येथील राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे दि.16 ऑक्टोबर रोजी फिट इंडिया फ्रीडम रन 3.0 चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील, उपप्राचार्य डॉ. एम.के.पटेल, डॉ. एस.डी. सिंदखेडकर यांनीही फ्रीडम रन मध्ये सहभाग घेऊन स्वयंसेवकांचा उत्साह वाढविला.पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, प्राचार्य डॉ. आर.एस.पाटील, उपप्राचार्य डॉ. एम.के.पटेल, डॉ. एस.डी. सिंदखेडकर यांनी उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.राजेंद्र पाटील, डॉ. वजीह अशहर, डॉ. वर्षा चौधरी आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.








