समाजात चांगल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या मंडळाचा गौरव करणे हाच उद्देश ठेवून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांची साथ असणे आवश्यक आहे, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा सुरू केली, यामागचा उद्देश हा समाजातील एकात्मता टिकून राहावी असाच होता. आजच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सामाजिक प्रश्न मांडण्याबरोबर समाजाला दिशा आणि विचार देण्याचे काम करीत आहेत. देशभक्ती, राष्ट्रउन्नती आणि राज्याची प्रगती दाखविण्याचे उत्तम माध्यम म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत साकारण्यात येणारे देखावे. यावर्षी प्रथमच उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले आणि या स्पर्धेत राज्यातील ३५६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला.
यावेळी, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय,उपसचिव विद्या वाघमारे, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे मंडळांचे अध्यक्ष श्रीराम मगरे, उपाध्यक्ष राजू काळे, सचिव रत्नाकर शेंडे, नगरसेवक जितेंद्र माळी, मुकेश माळी, योगेश पवार, सुरेश टवाळे, डॉ.प्रा.महेंद्र माळी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.








