नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार उदया दि.30 ऑगस्ट रोजी नंदुरबार जिल्हयात सर्वत्र बंद असलेल्या मंदिराच्या बाहेर शंखनाद, घंटानाद आंदोलन केले जाणार आहे.अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी दिली.
एकीकडे राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असुन त्यात डान्सबार, मदिरालये सुरु असतांना सोशल क्लबच्या नावाखाली जुगाराचे क्लब चालु असतांना मात्र भाविकांचे श्रध्दास्थान असलेले मंदिरे मात्र बंद आहे. देवळ, मंदिरे बंद असल्या कारणाने भाविकांना आपल्या श्रध्देय परमेश्वराकडे नमन वंदन करायला देखील या सरकारने बंदी घातली आहे. मंदिराच्या आधारीत व्यवसायिकांना देखील उपासमारीची वेळ आली आहे. फुल विक्रेता, नारळ विक्रेता, पुजेचे साहित्य विक्रेता यांच्यावर देखील उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गवर आहे. याची काळजी या सरकारला नाही. स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणुन घेणाऱ्या ठाकरे सरकारने मात्र हिंदु मानाचा अनादर केला आहे. हि हिंदु समाजाची चेष्ठा केली आहे. त्यासाठी उदया दि. 30 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 वा जिल्हयाभरात मंदिराबाहेर शंखनाद, घंटानाद आंदोलन करुन मंदिरे उघडण्याबाबत ठाकरे सरकारला जागे केले जाणार आहे. आंदोलनाचा भाग म्हणुन हातात मंदिर बंद, गरिबांचे हाल, मंदिर बंद उघडले बार, उद्धवा धुंद तुझे सरकार, भक्तों को जेल मंदिरों पे ताला, उद्धव सरकार में शराब का बोलबाला अशे घोषवाक्य असलेली निषेध फलक दाखविले जाणार आहे. अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी दिली.