Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दीड महिन्यात १ कोटीहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा मोफत एसटी प्रवास

team by team
October 18, 2022
in राज्य
0
दीड महिन्यात १ कोटीहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा मोफत एसटी प्रवास

मुंबई   l

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाच्या निर्णयामुळे अवघ्या ५२ दिवसांमध्ये १ कोटी ४ लाख ८६ हजार ज्येष्ठांनी याचा लाभ घेतला आहे. ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेला भरभरून प्रतिसाद मिळाल्याने १ कोटी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद राज्य शासनाला मिळाल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवासाच्या योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर अधिवेशन कालावधीत २५ ऑगस्ट, २०२२ रोजी ज्येष्ठांना  मोफत प्रवास योजनेसाठी प्रमाणपत्राचे वितरण करून योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

राज्यात २६ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर २०२२ या महिन्याभराच्या कालावधीत राज्यभरातून ५४ लाख ५८ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला होता. आता १६ ऑक्टोबरपर्यंत योजनेंतर्गत मोफत प्रवास केलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या १ कोटी ४ लाख ८६ हजार ८०९ एवढी झाली आहे. ज्येष्ठांना मोफत प्रवास योजनेमुळे जिल्ह्याच्या तसेच मोठ्या शहरांमध्ये वैद्यकीय उपचारासाठी जाणे शक्य होत आहे.

योजनेद्वारे राज्यभरातून दिवसाला सरासरी २ लाख ज्येष्ठ नागरिक एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे. प्रवासादरम्यान आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

पालिकेच्या कंत्राटी कामगारांना दिवाळीपूर्वी मागील वेतन व आगाऊ रक्कम द्यावी : भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावीत

Next Post

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळ रोखण्यासाठी धडक कार्यवाही करावी

Next Post
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळ रोखण्यासाठी धडक कार्यवाही करावी

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळ रोखण्यासाठी धडक कार्यवाही करावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

August 10, 2026
कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

August 10, 2026
सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 10, 2026
शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

August 10, 2026
शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

August 10, 2026
आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

August 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add