नंदुरबार l प्रतिनिधी
पालिकेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २९ ऑक्टोबरला होणार असल्याने तयारीला वेग आलेला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नंदुरबारला येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलेला असून, नियोजनासाठी शिंदे गटाचा शिवसेनेचे नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील रामवाडीत बैठक घेण्यात आली.
नंदुरबार नगर परिषदेच्या नूतन भव्य वास्तूचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १४ ऑक्टोबरला होणार होते. परंतु, अपरिहार्य कारणास्तव कार्यक्रम स्थगित झाला होता.२९ ऑक्टोबरला रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. उद्घाटनानंतर ग.तु पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर शिंदे गटाचा शिवसेनेची जाहीर सभा होणार असल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक रामवाडीत घेण्यात आली.
यावेळी जि.प सदस्य तथा शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड राम रघुवंशी,माजी सभापती विक्रमसिंह वळवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.सयाजीराव मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर पंचायत समितीच्या सभापती माया माळसे, शिंदे गटाचा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे,शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील,ज्येष्ठ कार्यकर्ते ताराचंद माळसे, उपजिल्हाप्रमुख कृष्णादास पाटील, तालुका प्रमुख रवींद्र गिरासे महानगर प्रमुख विजय माळी आदि उपस्थित होते. बैठकीत शिवसेनेचे पदाधिकारी,पालिकेचे नगरसेवक, सरपंच,उपसरपंच,ग्रा.पं व सेवा सोसायटीचे सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या संभाव्य कार्यक्रम
मुख्यमंत्र्यांच्या संभाव्य दौऱ्याच्या कार्यक्रम असा पालिकेचा उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी १० वाजता मुंबई येथून प्रयाण करतील.११.३० वाजता पोलीस मुख्यालयाच्या आवारातील हेलिपॅडवर आगमन होईल.१२.४५ वाजे दरम्यान पालिकेचा नूतन वास्तूचे उद्घाटन होईल. त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात उद्घाटनाच्या शासकीय कार्यक्रम होईल.दुपारी १.३० ते २ वाजेच्या दरम्यान ग.तु पाटील महाविद्यालयाच्या पटांगणावर शिंदेचा शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे.
मानपत्र देऊन मुख्यमंत्र्यांच्या नागरी सत्कार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पालिकेचे उद्घाटन झाल्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात त्यांना मानपत्र देऊन जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री व आमदारांना निमंत्रित करण्यात आले आहे.








