शहादा l प्रतिनिधी
तालुक्यातील शहादा शहरातील निलेश वाघ यांचा विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ पहेणी द्वारा आयोजित राज्यस्तरीय द रिअल हिरो पुरस्कार २०२२ वन्यजीव क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आज सर्पतज्ञ निलिमकुमार खैरे व सर्पतज्ञ देवदत्त शेळके यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
दरम्यान निलेश वाघ यांच्या या सन्मानाने सर्पमित्रांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल. तसेच समाज बांधव व नातेवाईकांनी कौतुक केले आहे.








