नवापूर | प्रतिनिधी
तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा आज निकाल जाहीर झाला. यात २८ ग्रामपंचायतीवर कॉंग्रेस, २१ ग्रा.पं.वर भाजप, तीन ग्रा.पं.वर राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेनेचे तीन व २१ अपक्षांनी दावा केला आहे.
तालुक्यातील ८१ पैकी ७८ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल लागला. सकाळी दहाला येथील वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात मतमोजणी करण्यास सुरुवात झाली. सहा फेर्या करण्यात आल्या. मतमोजणी शांततेत पार पडली.
निकालानंतर २८ ग्रामपंचायतीवर कॉंग्रेस, २१ ग्रा.पं.वर भाजप, तीन ग्रा.पं.वर राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेनेचे तीन व २१ अपक्षांनी दावा केला आहे.
गाव, पक्षनिहाय सरपंच असे
मोठे कडवान- भाजपच्या सरपंच देवलीबई बंधू वळवी, खानापूर – कॉंग्रेस पक्षाचे सरपंच ऍड प्रियंका जयंत गावीत, कोकणीपाडा-कॉंग्रेस पक्षाचे सरपंच मिनाबाई दुर्जन कोकणी, घोगळपाडा-कॉंग्रेस पक्षाचे सरपंच सुमित्रा लक्ष्मण वळवी, नवापाडा -भाजपचे सरपंच उमेश सोबजी गावीत, देवळीपाडा (धायटा)- अपक्ष सरपंच रोशन जितेंद्र वसावे, तलावीपाडा – कॉंग्रेस पक्षाचे सरपंच राजू नुरा वळवी, चितवी- कॉंग्रेस पक्षाचे कविता रविंद्र गावित, चिखली- कॉंग्रेस पक्षाचे सरपंच कमल वासू कोकणी, घोडजामने- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरपंच निर्मला रमेश गावीत, लहान कडवान-अपक्ष सरपंच सरला अनिल पाडवी, निमदर्डा – अपक्ष विक्रम कर्मा गावीत, बंधारे – कॉंग्रेस पक्षाचे सरपंच महादू बिजा गावीत, अंजने – भाजपचे सरपंच प्रशांत जालामसिंग नाईक, नावली – भाजपचे सरपंच गौरी गणेश कोकणी, उंबर्डी – भाजपचे सरपंच स्वप्निल भीमसिंग गावीत, बालअमराई- भाजप सरपंच प्रदीप रविंद्र गावीत, जामदा – भाजपचे सरपंच लक्ष्मण धेदु कोकणी, खैरवे – अपक्ष इंद्रसिंग मगरसिंग गावीत,
तारपाडा -भाजप सरपंच यशवंत विजेसिंग वसावे, मोगरानी -भाजप सरपंच सुशीला संजय कोकणी, करंजी बुद्रुक – कॉंग्रेस सरपंच रमेश सिपट्या गावीत, बंधारफळी -कॉंग्रेस सरपंच संगीता विनायक गावीत, झामणझर – अपक्ष सरपंच पौलस सायट्या मावची, बोरचक – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरपंच राहूल रवींद्र नाईक, बिलदा – कॉंग्रेस पक्षाचे सरपंच धर्मेंद्र जेमु वळवी, नवागाव – कॉंग्रेस प्रकाश बाळु नाईक, मळवान – सरपंच श्रीकांत कोकणी, पिंप्रीपाडा- कॉंग्रेस प्रमिला अशोक पाडवी, शिर्वे -सरपंच बिंदू वेच्या वळवी,
दापूर – कॉंग्रेस सरपंच जयराम मोत्या कुवर, कोळदा -अपक्ष सरपंच तेजस अभेसिंग वसावे, नगारे – बाळासाहेबांची शिवसेना सरपंच अनिता आनंद नाईक, मेहंदीपाडा – भाजप सरपंच प्रियंका प्रकाश गावीत, पांगराण-राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजप युतीचे सरपंच हिरालाल भादया कोकणी, करंजी खुर्द – अपक्ष सुनिल सदानंद चौधरी, वागदी – बाळासाहेबांची शिवसेना सरपंच ललिता वाडग्या गावीत, वडखुंट- भाजपचे सरपंच अबिता मोहन गावीत, तारापूर – कॉंग्रेस पक्षाचे सरपंच शीला गिरीष गावीत, खोकसा – भाजप सरपंच लुकेश साकर्या गावीत,
झामट्यावड – बाळासाहेबांची शिवसेना सरपंच हर्षली तुकाराम गावीत, चोरविहिर-कॉंग्रेस मायावती निलेश गावीत, डोगेगाव-भाजप सरपंच प्रदीप रावजी वळवी, वडसत्रा- अविनाश दिवानजी गावीत, लक्कडकोट – अपक्ष सरपंच वंदना नितीन गावीत, आमलाण- अपक्ष सरपंच अंजनाताई विलास वसावे, भरडू- कॉंग्रेस सरपंच प्रियंका विजय वळवी, सोनारेदिगर – कॉंग्रेस पक्षाचे सरपंच विनायक लासु वसावे, बोकळझर – अपक्ष सरपंच सुमन राहुल गावीत, थुवा – भाजप सरपंच वनिष विनू गावीत, हळदाणी- कॉंग्रेस सरपंच छाया वसंत गावीत, करंजाळी – कॉंग्रेस सरपंच गायत्री गणेश वसावे, देवमोगरा – कॉंग्रेस सरपंच सुषमा किरण वळवी, आमपाडा -अपक्ष गुलाब नंदया गावीत,
केलपाडा- भाजप सरपंच विपुल प्रताप वळवी, खांडबारा – कॉंग्रेस सरपंच अविनाश जगदीश गावीत, चिंचपाडा-भाजपचे सरपंच राहूल रमेश वसावे, नागझरी-भाजप सरपंच कुसुम प्रकाश गावीत, बीजगाव – प्रतिभा नेहरु गावीत, निजामपूर- रजीला सुमित नाईक, जामतलाव – सुमन सुरेश गावीत, रायपूर- संगीता सिंगा गावीत, बिलमांजरे- सरपंच नीलिमा राहुल गावीत, भवरे-सरपंच विजयाबाई प्रभू कोकणी, चौकी- सरपंच सविता सुनिल गावीत, सावरट- सरपंच संगीता विलास वसावे, देवळीपाडा- सरपंच प्रदिप भिकाजी गावीत, दुधवे- कॉंग्रेस पक्षाचे सरपंच क्षितीजा इंद्रसिंग गावीत, कामोद- सरपंच काशीराम रेशमा गावीत, सोनपाडा- कॉंग्रेस पक्षाचे सरपंच सलिता राजेंद्र नाईक, निजामपूर- सरपंच रजीला सुमित नाईक, वासदा – सरपंच अशोक आलू गावीत, गडद – सरपंच दिनकर पातळ्या गावीत, भादवड- सरपंच माया रेवाजी वळवी,
र्ईश्वर चिठ्ठी
चिखली- अखिल मनेश गावित या बालकाने ईश्वर चिठ्ठी काढली. चिखली ग्रामपंचायत सदस्य वार्ड क्रमांक उमेदवार स्त्री राखीव कोकणी कमल वासु व वसावे उर्मिला लालसिग यांना १३३ मते सारखी मिळाली. त्यावेळी ईश्वर चिठ्ठीने कोकणी कमल वासु याचे नाव ईश्वर चिठ्ठी ने विजयी घोषित केले केलपाडा ग्रामपंचायत येथील वार्ड क्रमांक तीन मध्ये ईश्वर चिट्ठीने उमेदवार विजयी झाला आहे. वसावे गुणवंती संदीप २२९ मते प्रतिस्पर्धी वळवी काजल फिलीप यांना समान मते पडल्याने ईश्वरचरणी काढून वसावे गुणवंती संदीप विजयी झाल्या.
बिलमांजरे ग्रामपंचायत पदाची निवड ईश्वरचिठ्ठीने झाली. या गावातील सरपंच पदाच्या निलिमा राहुल गावीत व मिनल याकूब गावीत यांना ४३८ मते पडल्याने ईश्वर चिट्ठीने निवड करण्यात आली. यात निलिमा राहुल गावीत या विजयी झाले.
गडद ग्रामपंचायतीतील सरपंच पदासाठी दिनकर पातळ्या गावित यांना १९१ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार हिनेश लाजरेस गावित यांना १९१ मते मिळाली. एका मुलाला बोलवून ईश्वरचरणी काळात यामध्ये दिनकर पातळ्या गावित यांची निवड झाली.








