नंदुरबार. | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील २०० ग्रामपंचायतींसाठी ७७.६८ टक्के शांततेत मतदान झाले होते.आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यात काँग्रसने बाजी मारली असून २०६ पैकी काँग्रेसने ७३ ग्रामपंचायतीत विजय मिळवला आहे.तर त्या पाठोपाठ भाजपाने ६३, उद्घव बाळासाहेब ठाकरे शिवसेना – १५, बाळासाहेबांची शिवसेना १४, राष्ट्रवादी ११, माकप २ तर २८ ग्रामपंचायतीत अपक्षानी बाजी मारली.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील ४४, अक्राणी तालुका २५, तळोदा तालुका ५३ व नवापूर तालुक्यातील ७८ अशा एकूण २०० ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी रविवार १६ ऑक्टोंबर, २०२२ रोजी मतदान होणार आहे. निवडणूकीसाठी मतदान केंद्रावर नियुक्त केलेले चार हजार १६७ मतदान अधिकारी, कर्मचारी मतदान साहित्य घेवुन रवाना झाले.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील ४५, अक्राणी तालुका २५, तळोदा तालुका ५५ व नवापूर तालुक्यातील ८१ अशा एकूण २०६ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी रविवार १६ ऑक्टोंबर, २०२२ रोजी मतदान होणार होते. मात्र अर्ज माघारी नंतर सहा ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या यात नवापुर तालुक्यातील जामतलाव, बिलबारा, तिळासर तर तळोदा तालुक्यातील सोमावल बुद्रुक ,धानोरा ,अक्कलकुवा तालुक्यातील कोयलीविहीर अशा सहा ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या. त्यामुळे २०० ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी रविवार १६ ऑक्टोंबर रोजी २०० ग्रामपंचायतींसाठी शांतेत मतदान पार पडले. २०० ग्रामंपचायतीसाठी अक्कलकुवा तालुक्यात १५५ मतदान केंद्र, अक्राणी तालुक्यात ८३, तळोदा तालुक्यात १६२, नवापूर तालुक्यात २५४ असे एकूण ६५४ मतदान केंद्र होते. या २०० ग्रामपंयातीसाठी ३ लाख ३० हजार ५२१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार होते. २०० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ४ हजार १६७ कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली होती. अक्कलकुवा तालुक्यात ८०.४८, अक्राणी तालुक्यात ७७.९१, तळोदा तालुक्यात ८०.९६, नवापूर तालुक्यात ७३.७० असे एकूण १ लाख २९ हजार ५६५ स्त्री मतदार तर १ लाख २७ हजार १८३ पुरूष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
काल या चार तालुक्यातील २०० ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी झाली. जिल्ह्यातील २०६ ग्रामपंचायतींमध्ये ७३ ग्रामपंचायतीत काँग्रसने विजय मिळवला आहे.तर त्या पाठोपाठ भाजपाने ६३, उद्घव बाळासाहेब ठाकरे शिवसेना – १५, बाळासाहेबांची शिवसेना १४, राष्ट्रवादी ११, माकप २ तर २८ ग्रामपंचायतीत अपक्षानी बाजी मारली.








