नंदुरबार । प्रतिनिधी
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनातंर्गत धडगांव वडफळया – रोषमाळ बु. नगर पंचायतीच्या ३८.२३ कोटीची पाणी पुरवठा योजना मंजुरी मिळाली आहे.
धडगांव शहराच्या महत्वाची पाणी पुरवठा प्रकल्पाला शासनाकडुन मंजुरी मिळाली असुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी धडगांव-वडफळया रोषमाळ बु. नगर पंचायतीला सदरची पाणी पुरवठा मार्गी योजना लवकरात लवकर लावू असे आश्वासन दिले होते. ते आश्वासनाची पुर्ती मुख्यमंत्री यांनी खरी ठरवली. त्या अनुषंगाने धडगांव पंचक्रोशीतील जनतेने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोघांचे योजनेला दि. १४ ऑक्टोबर रोजी मंजुरी प्रदान केल्यान जाहिर आभार व्यक्त केले.
धडगांव शहारासाठी ३८.२३ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजुर झाली असन त्यास प्रशासकीय मंजुरी सुध्दा मिळाली आहे. सदरची पाणी पुरवठा योजना हि महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान या योजनातर्गत करण्यात येणार आहे. या योजनेमुळे धडगांव वासियांना शुध्द पाणी मिळणार आहे. ३८.२३ कोटीची पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी, जि.प सदस्य विजयसिंग पराडके, रविंद्र पराडके, गणेश , पराडके,धडगांव वडफळया रोषमाळ बु. नगरपंचायतीचे नगरध्यक्ष धनसिंग पावरा, उपनगराध्यक्ष राजेद्र पावरा व सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका यांनी आभार मानले.








