नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील श्रीमती डी.आर.हायस्कूल येथे डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी करण्यात आली. व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक नारायण भदाणे तसेच उपमुख्याध्यापक सुभाष चौधरी ज्येष्ठ पर्यवेक्षक पंकज पाठक व विपुल दिवाण तसेच ग्रंथपाल मंगेश उपासनी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी राष्ट्रपती डॉ.कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आली तसेच अध्यक्ष भाषणात मुख्याध्यापक नारायण भदाणे यांनी डॉ.कलाम यांच्या जीवनातील वाचनाचे महत्त्व विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले. तसेच आजच्या या आधुनिक युगातील युवापीढी वाचनापासून फार लांब जात आहे.अशी अभ्यासपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देत दीपावलीच्या सुट्टीत कोणतेही पुस्तक वाचण्यासाठी आवाहन केले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथपाल उपासनी यांनी विविध पुस्तकांची प्रदर्शन वाचन करण्यासाठी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश बच्छाव यांनी केले.तर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी मार्गदर्शन व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
जागतिक हस्त स्वच्छता दिवस
नंदुरबार येथील श्रीमती डी.आर.हायस्कूल मध्ये 15 ऑक्टोबर जागतिक हस्त स्वच्छता दिवस म्हणून साजरा करण्यात आला.या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांसमोर स्वच्छ हात धुण्याची शास्त्रीयपद्धत विद्यार्थ्यांसमोर विज्ञान शिक्षक भरत पेंढारकर यांनी विद्यार्थ्यांच्या समवेत प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच आरोग्याच्या दृष्टीने योग्य पद्धतीने हात न धुतल्यामुळे होणाऱ्या आजाराबद्दल सविस्तर माहिती दिली.
मुख्याध्यापक नारायण भदाणे आरोग्य संदर्भात माहिती दिली.कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक नारायण भदाणे,उपमुख्याध्यापक सुभाष चौधरी पर्यवेक्षक पंकज पाठक व विपुल दिवाण तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे उपस्थित होते.








