शहादा l प्रतिनिधी
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात इंडिया टेक इंटरनॅशनल, मुंबई या कंपनी मार्फत सायबर सिक्युरिटी या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आले होते.
इंडिया टेक इंटरनॅशनलचे संचालक हरीश चंदर यांनी विद्यार्थ्यांना सायबर सिक्युरिटीबद्दल महत्वाचे पॉईंट्स सांगितले.विविध शाखांचे सुमारे दीडशे विद्यार्थी या सेमिनारला उपस्थित होते .
सेमिनार यशस्वी करण्यासाठी प्रा. विनोद महाजन, विभाग प्रमुख तसेच सेमिनारचे संयोजक प्रा. व्ही. टी. पाटील,अजहर पठाण संगणक शास्त्र विभाग व सहकारी मित्र यांनी सहकार्य केले.संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील,सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन जे पाटील , अॅकेडमिक डिन डॉ. डी. एम. पाटील यांनी उपक्रमाचे कौतुक केले.








