नंदुरबार l
तालुक्यातील वैंदाणे येथील सामाजिक कार्यकर्ते शेखर कुवर यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र युवक आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
धनगर समाजाच्या हिताचे संवर्धन करण्यासाठी श्री शेखर कुवर यांनी अनेक वर्ष कार्य केले आहे समाजाचे हित जोपसण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून योगदान दिले आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेत ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी त्यांना सदरचे नियुक्त पत्र देण्यात आले आहे. शेखर कुवर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे वैंदाणे परिसर व उत्तर महाराष्ट्र धनगर समाज कडून कौतुक करण्यात येत आहे.








