Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वैजाली जि.प.शाळेची उनपदेव येथे शैक्षणिक सहल उत्साहात

team by team
October 15, 2022
in शैक्षणिक
0
वैजाली जि.प.शाळेची उनपदेव येथे शैक्षणिक सहल उत्साहात

नंदुरबार

शहादा तालुक्यातील जि.प शाळा वैजाली शाळेचा रौप्य महोत्सव निमित्तानं शैक्षणिक सहल उनपदेव येथील गरम पाण्याचा झरा उनपदेव येथे असल्याने हे ठिकाण प्रसिद्ध आहे. या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.

निसर्गरम्य उंच सातपुडा पर्वतातील  पायथ्याशी असलेल्या उनपदेवचा परिसर एक पर्यटनस्थळांची माहिती व्हावी. उंच डोंगर आणि जंगलाचा परिसर असल्याने संपूर्ण परिसरात एक वेगळीच शांतता अनुभवयाला मिळाली. दुर्मिळ पक्ष्यांचा सहवासदेखील या जंगलात लाभतो. येथे साग, आवळा, सिताफळ, पळस जांभळा, हिरडा, झाडे मोठ्या प्रमाणावर दिसतात. त्याचप्रमाणे या परिसरात आदिवासींची लहान लहान पाडेदेखील अनुभवायला मिळाले.

शिंदीश्वर मंदिर, संतोषी माता मंदिर, गरम पाण्याचे दुय्यम स्नानकुंड, वनभोजनासाठीची व्यवस्था शाळेतील मुलांसाठी करण्यात आली होती. घनदाट वनराई, धरण, धबधबा, निसर्गरम्य बाग, फुलझाडे, नदीत पोहण्याचा आनंद शिक्षक, विद्यार्थ्यांनी घेतला. यामुळे या परिसराचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. सहलीतून विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञान, विज्ञानाबरोबर धम्माल मस्ती करून निसर्गाशी मैत्री वेगवेगळ्या वनस्पती आणि पक्षांची माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांना केवळ पाठ्यपुस्तकी शिक्षणाऐवजी अनुभवात्मक शिक्षण देण्याच्या उद्देशाने या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी विविध खेळांचा आनंद घेत मिष्टान्न भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी भौगोलिक, सजीव सृष्टी, झाडे आदींची माहिती या सहलीमध्ये सहभागी शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांना दिली. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सुदाम पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांचा विकास व विचारांना चालना देणे. तसेच शालेय विद्यार्थ्यांना शिस्त व निसर्ग प्रेमाचे धडे देत नाविन्यपूर्ण उपक्रमात सहलीचे आयोजन करण्यात आले होते. वर्गाच्या चार भिंतीच्या बाहेर असणाऱ्या निसर्गाचे दर्शन घडावे, विद्यार्थ्यांना अभ्यासातून सुटका मिळावी व मनोरंजनही व्हावे या हेतूने या सहलीचे आयोजन करण्यात आले. परिसरातील ऐतिहासिक व भौगोलिक माहितीसाठी सहल  आयोजित केली. विद्यार्थ्यांनी आनंदाबरोबरच निरीक्षणातून माहिती घेतली.

उनपदेव स्थळ पाहून मनसोक्त आनंद घेतला. सहकार्य गटशिक्षणाधिकारी डि.टी.वळवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण पाटील, चंद्रशेखर पाटील, शरद पाटील, कविता सोमवंशी, सुरेखा पाटील सहलीत सहभागी शिक्षकवृंद भरत पावरा,चंदू पाटील, उषा पाटील,राजू मोरे, गोपाल गावीत आदी शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

घरफोडीच्या गुन्ह्यातील 3 आरोपींना न्यायालयाने ठोठावला 2 वर्ष सश्रम कारावास

Next Post

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये शिक्षिका अलका पाटील यांच्या शैक्षणिक साहित्यास द्वितीय क्रमांक, प्रहार शिक्षक संघटनेमार्फत सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add