शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ व श्री.पी.के.अण्णा पाटील फाऊंडेशन , शहादा , यांच्या संयुक्त विद्यमाने कै.अण्णासाहेब पी.के.पाटील स्मृती ऑनलाईन खुली राज्यस्तरीय पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धा ‘ दि .१८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे .
स्व.अण्णासाहेबांच्या सातव्या स्मृती दिनी ऑनलाईन खुली राज्यस्तरीय पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे . या स्पर्धेच्या माध्यामातून उत्तम वक्ते , वादपटू व विचारवंत निर्माण व्हावेत . त्यांनी वेळोवेळी महत्वाच्या विषयांवर सखोल चिंतन करावे . ते समाजासमोर मांडावे हा हेतू समोर ठेवून कोविड -१ ९ च्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन खुली राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे शनिवार दि .१८ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजन करण्यात आले आहे . वक्तृत्व स्पर्धेचे विषयांत वक्तृत्व स्पर्धा नैसर्गिक आपदा व आधुनिक मानवी जीवन , मी शेतकरी होणार , सत्याग्रही क्रांती शास्त्र , गीत नवे गाईन मी , थांबला तो संपला या पाच विषयांचा समावेश आहे . ऑनलाईन नियमावली अशी राज्यस्तरीय ऑनलाईन खुली वक्तृत्व स्पर्धा पंधरा ते पंचवीस वर्षे वयोगटातील स्पर्धकांसाठी राहील . प्रथम नोंदणी करणाऱ्या १५० स्पर्धकांना स्पर्धेत सहभागाची संधी देण्यात येईल . दि .१० सप्टेंबर २०२१ पावेतो ऑनलाईन नोंदणीसाठी लिंक खुली राहणार असून स्पर्धेसाठी कुठल्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही . विजेत्यांसाठी प्रथम पारितोषिक रक्कम रुपये ५००० व प्रमाणपत्र , द्वितीय पारितोषिक रक्कम रुपये ३५०० व प्रमाणपत्र , तृतीय पारितोषिक रक्कम रुपये २५०० व प्रमाणपत्र , उत्तेजनार्थ दोन बक्षीसे प्रत्येकी १००० रुपये व प्रमाणपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत . ऑनलाईन खुली राज्यस्तरीय पुरूषोत्तम वक्तृत्व स्पर्धेच्या संयोजन , नियोजन व यशस्वीतेसाठी दीपकपाटील ( अध्यक्ष , पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ , शहादा ) , प्रा.मकरंद पाटील ( सचिव , श्री.पी.के.अण्णा पाटील फाऊंडेशन , शहादा ) , पी.आर.पाटील ( समन्वयक अर्थ व बांधकाम विभाग , पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ , शहादा ) यांच्यासह संयोजन समिती अध्यक्ष डॉ.विश्वास पाटील , कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील , सदस्य प्राचार्य डॉ . एस.पी पवार प्रा.डॉ. विजयप्रकाश शर्मा , प्रा.डॉ. तुषार पटेल परिश्रम घेत आहेत .
Good
Yes I am ready
I am interested