शहादा l प्रतिनिधी
परिसराचे नेते,सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपकभाई पाटील यांचा हीरक महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा आज हितचिंतकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

शहादा तालुका खरेदी विक्री संघाच्या प्रांगणात दि.13 ऑक्टोंबर गुरुवार रोजी सकाळी दहा ते दुपारी एक या नियोजित वेळेत दीपक पाटील व जिल्हा परिषद सदस्या सौ.जयश्रीबेन दीपक पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला.अमृत महोत्सवी वाढदिवस कार्यक्रमास शहादा-तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध पक्षीय नेते-कार्यकर्ते,आजी-माजी नगरसेवक, नवनियुक्त सरपंच-उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती होती.

यांत प्रामुख्याने सातपुडा साखर कारखान्याच्या माजी अध्यक्ष श्रीमती कमलताई पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजाराम तुकाराम पाटील,व्हाईस चेअरमन जगदीश पाटील, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, उपसभापती रविंद्र रावल, सातपुडा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रेमसिंग आहेर,

सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन रोहिदास पाटील, पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील,नागाई शुगर इंडस्ट्रीचे डॉ.रविंद्र चौधरी, मयूरभाई पाटील, माजी नगराध्यक्ष विजय दामू पाटील,सौ.संगिता विजय पाटील, सातपुडा शिक्षण मंडळ सचिव प्रा.संजय जाधव, महावीर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रमेशचंद्र जैन,
गुरूचरणसिंग राजपाल, माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर आदिंची प्रमुख उपस्थिती होती.सूत्रसंचालन प्रा.डाॅ.विजयप्रकाश शर्मा यांनी केले.आभार खरेदी विक्री संघाचे मॅनेजर अनिल पाटील यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बापूसाहेब सत्कार समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.








