तळोदा | प्रतिनिधी
तळोदा येथे नूतन पोलिस निरीक्षक म्हणून केलसिंग पावरा यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. दरम्यान शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष योगेश मराठे व कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन तळोद्यातील प्रमुख समस्यांबाबत चर्चा केली.
पोलिस निरीक्षक पंडितराव सोनवणे यांच्याकडे तळोदा पोलीस ठाण्याच्या मागील चार महिन्यांपासून प्रभारी पदभार सोपविण्यात आला होता. दरम्यान गुरुवारी त्यांच्या जागी मूळ तळोदा तालुक्यातील रहिवासी असलेले केलसिंग पावरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरा तळोदा पोलीस ठाण्याच्या पदभार स्वीकारला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तळोदा शहर अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन तळोद्यातील विविध समस्यांबाबत चर्चा केली. याप्रसंगी नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भरत चौधरी, सामाजिक कार्यकर्ते संदीप परदेशी, गणेश पाडवी, मोहन पोटे, विकास क्षत्रिय, इमरान शिकलीकर, धर्मराज पवार आदी उपस्थित होते.