नंदुरबार । प्रतिनिधी
धुळे शहरातील देवपुरातील नकाणे रोडवरील आंबेडकर नगरात काल अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. अंड्डयाची भाजी बनवून दिली नसल्याचा राग येऊन पतीने पत्नीवर कुर्हाडीने प्राणघातक हल्ला केला. त्यात पत्नी गंभीर झाली असून पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी भाग्यश्री राजेंद्र नेतकर रा. स्टेशन रोड, धुळे ह.मु आंबेडकर नगर, नकाणे रोड, धुळे हिने वडिलांविरोधात तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार काल साडेआठ वाजेच्या सुमारास साहेबराव भिमराव अहिरे रा. आंबेडकर नगर, नकाणे रोड, देवपूर, धुळे याने पत्नी छायाबाई (वय 40) हिने अंड्यांची भाजी बनवून दिली नाही म्हणून तिच्याशी वाद घातला. घराच्या माळावर ठेवलेली कुर्हाड आणून पत्नीला मला तु आज अंडे बनवून दिले नाही, मी तुला जिवे मारणार आहे, असे सांगत तिच्या डोक्यावर कुर्हाडीने वार करत तीला गंभीर जखमी केले. हल्ला केल्यानंतर साहेबराव अहिरे हा पसार झाला. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात साहेबराव अहिरे याच्यावर भादंवि कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सैय्यद करीत आहेत.