नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटाने वर्चस्व राखले. सभापतीपदी हिराबाई रवींद्र पराडके तर उपासभापती पदी भाईदास अत्रे यांची बिनविरोध फेरनिवड झाली.
पंचायत समितीच्या पुढील अडीच वर्षाचा कालावधीसाठी धडगाव पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली, यात सभापती पदासाठी हिराबाई रवींद्र पराडके, व उपसभापती पदासाठी भाईदास कर्मा अत्रे यांच्या प्रत्येकी एक नामांकन अर्ज दाखल होता दुपारी 3 वाजता झालेल्या निवड प्रक्रियेत 15 पैकी 9 सदस्यांची मते मिळाल्याने सभापती पदी शिवसेना शिंदे गटाचे हिराबाई रवींद्र पराडके तर उपसभापती पदी भाईदास अत्रे यांनी बिनविरोध निवळ करण्यात आली.
यामुळे या पंचायत समितीवर विजयसिंग पराडके गटाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. निवडणूक प्रक्रियेत पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून गोस्वामी यांनी कामकाज पाहिले.निवडणूकीचा निकाल जाहीर होताच शिवसेनिकांनी फडक्याच्या आतिषबाजी करत एकच जल्लोष केला.
यावेळी तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा जिल्हा परिषद सदस्य विजयसिंग पराडके, जि.प.सदस्य रवींद्र पराडके,नगराध्यक्ष धनसिंग पावरा,उपनगराध्यक्ष राजेंद्र पावरा,मा.जि.प.सदस्य योगेश पाटील,नगरसेवक रघुनाथ पावरा,फत्तेसिंग पावरा, दिलवरसिंग पावरा, शरीफ पिंजारी,ललित जगदाळे,बंटी सोनवणे,अशोक पराडके,तसेच पंचायत समिती सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.