नवापूर l प्रतिनिधी
नवापूर पं.स सभापती व उपसभापती निवडणुकसाठी कॉग्रेस पक्षाकडुन बबीता नरेंद्र गावीत,उपसभापती शिवाजी पायल्या गावीत,भाजप कडुन सभापतीपदासाठी गीता आयुब गावीत,उपसभापती राजु डोंगरसिंग कोकणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असता श्रीमती बबीता नरेंद्र गावीत यांना ११ मते व श्रीमती गीता आयुब गावीत यांना ८ मते मिळाली
तसेच उपसभापती पदासाठी शिवाजी पायल्या गावीत यांना ११ मते व राजु डोंगरसिंग कोकणी यांना ८ मते मिळाली.तसेच राजेश पदमाकर गावीत यांनी तटस्त असल्याचे सांगितले त्यामुळे पिठासन अधिकारी तथा तहसिलदार मंदार कुलकर्णी यांनी कॉग्रेस पक्षा कडील सभापती बबीता नरेंद्र गावीत व उपसभापती शिवाजी पायल्या गावीत यांची निवड करण्यात आली.मतदान हात उचावुन करण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी सी के माळी,वरीष्ठ सहायक नरेंद्र वसावे आदी उपस्थित होते.यावेळी निवडणुन आलेले सभापती व उपसभापती यांच्या सत्कार तहसिलदार मंदार कुलकर्णी,गटविकास अधिकारी सी के माळी, जि.प सभापती अजित नाईक व जि.प सदस्य दिपक नाईक यांनी केला.
यावेळी पं.स कार्यालयाचा आवारात कॉग्रेस पक्षाच्या कार्यकरता यांनी फटाक्याची आतिषबाजी करुन जल्लोश साजरा केला.या नंतर सभापती व उपसभापती यांनी महामान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले या नंतर नवापूर तालुक्याचे आमदार शिरीषकुमार नाईक यांनी त्यांच्या कार्यालयात सभापती व उपसभापती यांच्या सत्कार केला.यावेळी उपनगराध्यक्ष आयुब बलेसरीया,माजी सभापती रतीलाल कोकणी,दिलीप पवार,बिलदा सरपंच नरेंद्र गावीत सह कॉग्रेस पक्षाचे सर्व पं.स सदस्य उपस्थित होते.