शहादा l प्रतिनिधी
परिसराचे नेते,सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपकभाई पाटील यांचा हीरक महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा उद्या हितचिंतकांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
शहादा तालुका खरेदी विक्री संघाच्या प्रांगणात आज दि.13 ऑक्टोंबर गुरुवार रोजी सकाळी दहा ते एक वाजेच्या दरम्यान अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. परिसराचे नेते दीपकभाई पाटील यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस कार्यक्रम शहादा-तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध पक्षीय नेते-कार्यकर्ते, यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. उपस्थितीचे आवाहन बापूसाहेब सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
गुरुवारी बुद्धिबळ स्पर्धा
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील यांच्या जन्मदिवसानिमित्त अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सरदार पटेल सभागृहात बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन गटात होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन दीपकभाई पाटील यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिकांसह सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. मंडळाचे शैक्षणिक व प्रशासकीय समन्वयक प्रा मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील यांच्यासह विविध विद्याशाखांचे प्राचार्य व कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापक वृंदातर्फे या स्पर्धेचे संयोजन केले आहे.या स्पर्धेत सुमारे 60 पेक्षा अधिक स्पर्धकांची नोंद झाली आहे.