नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांची मुंबई येथे बदली झाली असून एस. एम. कुर्तकोटी नंदुरबार जिल्हा परिषदेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग अप्पर मुख्य सचिव सेवा नितीन गद्रे यांच्या दिनांक बारा दहा दोन हजार बावीस शासन परिपत्रकानुसार नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ के गावडे यांची बदली अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई येथे झाली आहे.
तर त्यांच्या जागी भारतीय प्रशासन सेवेत पदोन्नतीने एस. एम. कुर्तकोटी यांची परिविक्षाधीन नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार या पदावर करण्यात आली आहे. या नवीन पदाचा पदभार श्री एस एम कुर्तकोटी हे लवकरच तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ के गावडे यांच्याकडून स्वीकारणार आहे.
समीर माधवराव कुर्तकोटी
शिक्षण – एम ए (इतिहास)
मूळ गाव — राजगुरुनगर (खेड) जि पुणे
१९९६ मध्ये सरळ सेवा भरतीने उपजिल्हाधिकारी म्हणून शासन सेवेत दाखल.
महत्वाची कामे — जव्हार (तत्कालीन जिल्हा ठाणे, आताचा पालघर) येथे आदिवासी भागात उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले. यांत सुमारे १९००० आदिवासींना वनहक्क मिळवून देण्यासाठी महत्वाचे योगदान.
नवीन भूसंपादन कायद्याअंतर्गत महाराष्ट्र राज्याचे नियम तयार करून देण्यासाठी महत्वाचे योगदान.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात भूसंपादन तज्ज्ञ म्हणून शासनाने खास नियुक्ती केली. या प्रकल्पासाठी भूसंपादनाचे धोरण तयार करून दिले.
प्रकल्पासाठी खासगी वाटाघाटीने जमीन खरेदी करण्याचे धोरण तयार करण्यात महत्वाचा सहभाग.
मुंबई मेट्रो प्रकल्पात भूसंपादन व पुनर्वसन केले.
भूसंपादन विषयांत अधिकारी, न्यायाधीश यांना प्रशिक्षणे दिली.
सप्टेंबर २०२२ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत नामनिर्देशन.
छंद – वाचन व हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत.
सध्या पोस्टींग – अध्यक्ष, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अमरावती