नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील होळ तर्फे हवेली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ग्रामविकास पॅनल प्रणित शिंदे गटाच्या शोभाबाई रवींद्र पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.
नंदुरबार तालुक्यातील होळ तर्फे हवेली ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया बुधवारी घेण्यात आली. सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ होती. विहित मुदतीत ग्रामविकास पॅनल प्रणित शिंदे गटाच्या शोभाबाई रवींद्र पवार यांच्या एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
दुपारी २ वाजता निवडणूक निरीक्षक ईश्वर सोनवणे यांनी अधिकृत निवड झाल्याचे जाहीर केले. उपसरपंचपदी शोभाबाई रवींद्र पवार यांची नियुक्ती झाल्यानंतर समर्थकांनी ग्रामपंचायत आवारात फटाक्यांचे आतिषबाजी करीत जल्लोष केला.
सरपंच मनीष नाईक यांनी नवनियुक्त उपसरपंचांच्या सत्कार केला. याप्रसंगी नगरसेवक रवींद्र पवार, ग्रा.पं सदस्य सुशीला वळवी,आत्माराम नाईक, प्रतिभा मराठे, पंचशीला शिरसाठ, रुपेश जगताप,सोनाली कोतवाल, भावना ठाकरे,सरूबाई कोतवाल, रत्नप्रभा खैरनार आदि उपस्थित होते.