नंदुरबार l प्रतिनिधी
खांडबारा ता.नवापूर येथे रेल्वे रूळा खालून वीज वितरण कंपनीच्या केबल टाकण्यात आली होती. या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने पूर्व सूचना न देता अचानक वायर कट केल्याने 85 खेड्यांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे शेतकरी, वीज ग्राहकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरातील 85 खेड्यांचा वीज पुरवठा काल दि.11 ऑक्टोंबर रोजी सकाळी सात वाजेपासून अचानक खंडित झाला.खांडबारा रेल्वे रूळा खालून वीज वितरण कंपनीच्या केबल टाकण्यात आली होती. या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने पूर्व सूचना न देता अचानक वायर कट केल्याने 85 खेड्यांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे शेतकरी, वीज ग्राहकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांचा पिकापाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे. तसेच नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा समस्याला सामोरे जाऊ शकतो. 85 गावातील ग्रामस्थांना किती दिवस अंधारात राहावे लागते हे अधांतरीत आहे. याबाबत संबधीतांनी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली.