नंदुरबार l
शहरातील नर्मदा एजन्सी जवळ अज्ञात चोरट्यांनी संधी साधून तीन बॅटऱ्या चोरुन सुमारे ३५ हजारांचा मुद्देमाल पळवून नेला.
नंदुरबार येथील बॅटरी व्यावसायिक मोहम्मद सय्यद शेख नासिर हुसेन यांचे शहरात बॅटरी शॉप आहे.अज्ञात चोरट्यांनी संधी साधून त्यांच्या दुकानाच्या शटरला लावलेले कुलपाची कडी तोडून दुकानात प्रवेश करून सुमारे ३४ हजार ५०० रुपयांच्या बॅटऱ्या चोरून नेल्या.
याबाबत मोहम्मद सय्यद शेख नासिर हुसैन यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय दंडविधान कलम ४५४,४०७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.स्वप्निल शिरसाठ करीत आहेत.