नंदुरबार l
तळोदा तालुक्यातील चिनोदा येथील माहेर असलेल्या विवाहितेचा चारित्र्याच्या संशयावरुन छळ केल्याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चारित्र्याचा संशय घेत एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण करीत शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयितांमध्ये पंकज पंढरीनाथ पाटील, ताराबाई पंढरीनाथ पाटील (दोन्ही रा.नवीन आश्रवा, ता.निझर जि.तापी) राजेंद्र काशिनाथ पाटील, उषाबाई राजेंद्र पाटील (दोघे रा.कुकरमुंडा), वैशाली अनिल पाटील (रा.वेलदा), आरती गणेश पटेल (रा.मामाचे मोहिदे, ता. शहादा) संजय जगन पटेल या सात जणांविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४९८, ३२३, ५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास विनोद नाईक करीत आहेत.