नंदुरबार l
तालुक्यातील आडची येथे वीज चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार तालुक्यातील शरद उत्तम चौधरी यांनी वीजेची कायदेशीर जोडणी नसताना घराच्या पूर्व बाजूस सुमारे ३५ फूट अंतरावर महावितरण कंपनीच्या लघुदाब वाहिनीवर सिंगल कोअर असलेल्या ४० फूट वायरने आकडा टाकून बेकायदेशीररित्या घरासाठी वीजचोरी केल्याने त्यांच्याविरोधात
नंदुरबार ग्रामीण कक्षाचे कनिष्ठ अभियंता राजश्री भरत पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा कलम २००३ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस नाईक.स्वप्नील शिरसाठ करीत आहेत.