नंदुरबार l
नगर परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत नंदुरबार नगरपालिकेच्या नविन इमारतीतील सभागृहाला स्व.लोकनेते माणिकराव गावीत यांचे नाव देण्याचा ठरावावर सर्वांमते मंजूरी देण्यात आली. यासह विविध १३ विषय मंजूर करण्यात आले.
नंदुरबार येथे नगरपालिकतर्फे काल दि.१० ऑक्टोंबर रोजी नगरपालिका येथे अटलबिहारी वाजपेयी सभागृहात स्थायी समितीच्या सभेचे नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याधिकारी श्री.बागुल, उपनगराध्यक्ष कुणाल वसावे आदी उपस्थित होते.
या बैठकीत शहरातील विविध विकास कामांचा १२ विषयांना मंजूरी देण्यात आली. यावेळी नगरसेवकांनी दिलेल्या अर्जावर विचार विनीकर करून नंदुरबार पालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या नगरपालिकेची नविन इमारतीच्या सभागृहाला लोकनेते स्व.माणिकराव गावीत यांचे नाव देण्याचा ठरावा मांडण्यात आला.
यावेळी सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी भाजपा नगरसेवक प्रशांत चौधरी यांनी नंदुरबार शहरातील नेहरू पुतळयापासून ते सुभाष चौकापर्यंत असलेल्या रस्त्याला नंदुरबार शहरातील हुतात्मा शशिधर केतकरमार्ग असे नामंकरण करण्यात यावे अशी मागणी केली.
बालशहिदांची राहणारी वास्तु केतकरवाडा आज जमिनोदस्त झाला आहे.
तेथे खाजगी व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे त्या रस्त्याला हुतात्मा शशिधर केतकरमार्ग नांव देण्याची मागणी केली. मात्र ही मागणी नंतर मंजूर करण्यात येईल. असे सांगण्यात आले.
नंदुरबार येथील स्थायी सभेत आज नविन इमारतीच्या सभागृहाला स्व.माणिकराव गावीत यांचे नाव देण्यात आले. त्याबद्दल सर्व नगरसेवकांचे अभिनंदकरून आभार मानले. या आजच्या सभेत भाजपा नगरसेवकांनी नेहरू पुतळा ते नगरपरिषदपर्यंत या रस्त्याला शहिद शशिधर केतकर यांचे नाव देण्याच्या मागणी संदर्भात ८ दिवसापुर्वी पत्र दिले होते. मात्र आजच्या बैठकीत त्यावर कुठलाही विचार करण्यात आला नाही. यासोबत चव्हाण चौकात नविन वास्तु तयार करण्यासाठी पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावीत यांनी ६० लाख मंजूर केले आहे. मात्र असे असतांनाही पालिकेतर्फे एनओसी दिली जात नाही. तेथील वास्तु जीर्ण झाली आहे. नंदुरबार पालिकेत गेल्या दहा वर्षापासून एकच ठेकेदार काम करीत आहे. पालिकेने सामान्य नागरीकांसोबतच नंदुरबारकररांचा विचार करून हुतात्मे शशिधर केतकर यांचे नांव द्यावे.
माजी आ. शिरीष चौधरी








