तळोदा l प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सालाबादप्रमाणे आश्विन पौर्णिमेच्या दिवशी श्री विठ्ठल स्वामी महाराज यांच्या मुरलीधर मंदिर द्वारा आयोजित श्री खंडोजी महाराजांच्या रथ ९ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी दोन वाजता लोकनियुक्त नगराध्यक्ष अजयभैया परदेशी यांच्या हस्ते आरती व विधीवत पुजा करण्यात आली.
याप्रसंगी योगेश मराठे, सुभाष चौधरी, गौरव वाणी, हितेंद्र क्षत्रिय, शिरीष (बंबू) माळी, किरण सुर्यवंशी, सुधिर वाणी रसिकलाल वाणी, आदिसह रथ समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. मुरलीधर मंदिरापासून वाजतगाजत ठराविक अंतर दोराचा सहाय्याने नंतर टॅक्कर च्या सहाय्याने काढण्यात आली
सदर या रथोत्सवाची १२७ वर्ष जुनी परंपरा वर्षोन वर्षं पर्यंत आजतागायत तळोदे शहरात अखंडीतपणे सुरू आहे. त्या प्रमाणे या वर्षीसुद्धा कोजागिरी पौर्णिमाच्या दिवशी भगवान बालाजींची मुर्ती रथात ठेऊन मोठ्या भक्तिभावाने मिरवणूक काढण्यात आली.सदर मिरवणूक मुरलीधर मंदिरापासून मेनरोडने हनुमान मंदिर मार्गे स्मारक चौक, हुतात्मा चौक येथून परत हातोडा नाक्याजवळ विसर्जित करण्यात आली. शहर व तालुक्यातील नागरिक, अबालवृद्ध, महिला भगीनींंनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती व सुहासिनी पुजा केली व प्रसाद म्हणून केळी वाटप करत रथ पुढे जात होता. तर यावेळी शहराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
सदर हा रथ पुरातन काळापासून १२७ वर्षी पूर्वी सातपुड्याच्या सागवानी लाकडापासून तयार करण्यात आला असून या रथाला रथ खराब होऊ नये म्हणून दरवर्षी तेल लावण्यात येत होते. परंतु कालांतराने महागाई मुळे आता सदर रथाला रंग बेरंगी रंग लावून सजविण्यात आला आहे व रथावर धजा लावण्यात आल्या होत्या.
सदर रथावर विविध अवताराचे भगवानाचा कोरीव लाकडापासून बनवलेले एकूण २४ मुर्ती चोहोबाजूंनी या रथावर प्रत्येकाच्या कंप्यात बसविण्यात येतात सदर रथावर बसविण्यात येणाऱ्या मुर्त्या सातपुड्याच्या सागवानी लाकडापासून बनवलेल्या आहेत. त्या आजतागायत जशाच्या तशा स्थितीत आहेत. रथावर कोरीव नक्षीकाम केलेले आहे.
यावरून पुरातन काळापासून शहरात व परिसरात जुने कुशल कारागीर होते हे सिद्ध होते. तर प्रथम दर्शनी साधारण पाच फुटाचे हुबेहूब लाकडाचे दोन सफेद रंगाचे घोडे त्यावर लगाम भगवान श्रीकृष्ण यांच्या हातात सारथी म्हणून असते तर अर्जुनाची मुर्ती रथ हाकतांना दिसते त्यांच्या जवळच दोन सागवानी लाकडापासून बनवलेले सहा फुट उंचीचे भालदार चोपदार उभे राहिलेले असतात तर गणपती, दत्तात्रय, राधाकृष्ण, नरसिंह अवतार, पासून सर्व अवतार, रथावर दोन गरुड व भगवान श्रीकृष्ण यांच्या एक गरुड असे तीन लाकडाचे गरुड आदिंसह २४ मुर्ती सदर रथावर विराजमान होतात.
रथ मिरवणूक साठी रथ समितीचे पदाधिकारी नरेंद्र ओझा महाराज, रोहित कापडीया, सुधीर वाणी, गौरव वाणी, मनिष सुगंधी, संतोष वाणी, रथाचे देखभाल सुतारी काम करणारे श्रावण मिस्त्री, रथाला मोगरी लावणारे वाल्मीक तांबोळी, विजय तांबोळी आदिंनी परीश्रम घेतले
तर सदर रथाच्या मार्गावर पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदार व पोलिस कर्मचारी यांनी बंदोबस्त चोख ठेवला होता.तर याप्रसंगी वीज वितरण कंपनीचे अभियंता तिरुपती पाटील तसेच सहकारी कर्मचारी यांनी मिरवणूक दरम्यान वीजपुरवठा बंद केला होता व रथाला अडथळा करणाऱ्या वायर काढण्यात आल्या होत्या तर रथ पुढे गेल्यावर सदर खंडित वीज पुरवठा परत सुरू करण्यात आला








