Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे जिल्हास्तरीय गुणवत्ता मेळावा

team by team
October 8, 2022
in सामाजिक
0
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे जिल्हास्तरीय गुणवत्ता मेळावा
शहादा   l
    पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचालित कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे  विजयादशमीच्या दिवशी महात्मा गांधी सभागृह येथे जिल्हास्तरीय  गुणवत्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद सहाय्यक संचालक जगताप मॅडम उपस्थित होत्या.यावेळी डाएटचे प्राचार्य भटकर , प्राथमिक शिक्षणाधिकारी नंदुरबार  सतिश चौधरी, गटशिक्षणाधिकारी शहादा वळवी , डायट अधिव्याख्याता डॉ. वनमाला पवार यांची प्रमुख अतिथी उपस्थिती होती.
सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. शाळेतील विद्यार्थीनींनी स्वागत गित सादर केले.शाळेच्या मुख्याध्यापिका निलिमा पाटील यांनी कार्यक्रमाचा मुख्य उद्देश प्रस्तावनेत मांडला. तसेच विद्यार्थीनीच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय समोर ठेवून तणावमुक्त वातावरणात गुणवत्तापुरक उपक्रम कसे राबवितो याविषयी माहीती सांगून सर्व उपक्रमांचे सादरीकरण स्टॉलवर मांडण्यात आले आहे असे सांगितले. माया तसेच शांतीलाल मुथा फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक प्रदीप परदेशी यांनी डॉ. बाबासाहेब
आंबेडकर आदर्श शाळा योजनेच्या सर्व माहीतीचे सादरीकरण केले.
तसेच ज्ञानप्रकाश अवकाश फांउडेशन, पिरामल फांउडेशन,प्रथम फाउंडेशन  या सर्व स्वयंसेवी संस्थांनी सादरीकरणात सहभाग नोंदविला.श्री. चौधरी साहेबांनी मार्गदर्शन करून विद्यार्थीनी व शिक्षकांचे कौतुक केले. डायट प्राचार्य डॉ.भटकर  म्हणाले, शिक्षक हा स्वप्नसृजन असावा व विद्यार्थी हा स्वप्नरंजन असावा. याविषयी मागदर्शन केले.जगताप मॅडम यांनी विद्यार्थीनींना राष्ट्राच्या सेवेसाठी तत्पर राहण्याचे आवाहन केले.विद्यार्थीनींनी केलेल्या नृत्याविषयी त्यांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेतील शिक्षक योगेश पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारींसह एनजीओचे सदस्य,प्रतिनिधी यांचेही सहकार्य लाभले.
बातमी शेअर करा
Previous Post

शहादा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र अग्रवाल, तर सचिवपदी प्रा. नेत्रदीपक कुवर यांची पुनर्निवड.

Next Post

लम्पी बाधित जनावराचा मृत्यू झाल्यास सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई

Next Post
लम्पी बाधित जनावराचा मृत्यू झाल्यास सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई

लम्पी बाधित जनावराचा मृत्यू झाल्यास सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add