शहादा l
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचालित कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे विजयादशमीच्या दिवशी महात्मा गांधी सभागृह येथे जिल्हास्तरीय गुणवत्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद सहाय्यक संचालक जगताप मॅडम उपस्थित होत्या.यावेळी डाएटचे प्राचार्य भटकर , प्राथमिक शिक्षणाधिकारी नंदुरबार सतिश चौधरी, गटशिक्षणाधिकारी शहादा वळवी , डायट अधिव्याख्याता डॉ. वनमाला पवार यांची प्रमुख अतिथी उपस्थिती होती.

सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. शाळेतील विद्यार्थीनींनी स्वागत गित सादर केले.शाळेच्या मुख्याध्यापिका निलिमा पाटील यांनी कार्यक्रमाचा मुख्य उद्देश प्रस्तावनेत मांडला. तसेच विद्यार्थीनीच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय समोर ठेवून तणावमुक्त वातावरणात गुणवत्तापुरक उपक्रम कसे राबवितो याविषयी माहीती सांगून सर्व उपक्रमांचे सादरीकरण स्टॉलवर मांडण्यात आले आहे असे सांगितले. माया तसेच शांतीलाल मुथा फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक प्रदीप परदेशी यांनी डॉ. बाबासाहेब
आंबेडकर आदर्श शाळा योजनेच्या सर्व माहीतीचे सादरीकरण केले.
तसेच ज्ञानप्रकाश अवकाश फांउडेशन, पिरामल फांउडेशन,प्रथम फाउंडेशन या सर्व स्वयंसेवी संस्थांनी सादरीकरणात सहभाग नोंदविला.श्री. चौधरी साहेबांनी मार्गदर्शन करून विद्यार्थीनी व शिक्षकांचे कौतुक केले. डायट प्राचार्य डॉ.भटकर म्हणाले, शिक्षक हा स्वप्नसृजन असावा व विद्यार्थी हा स्वप्नरंजन असावा. याविषयी मागदर्शन केले.जगताप मॅडम यांनी विद्यार्थीनींना राष्ट्राच्या सेवेसाठी तत्पर राहण्याचे आवाहन केले.विद्यार्थीनींनी केलेल्या नृत्याविषयी त्यांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेतील शिक्षक योगेश पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारींसह एनजीओचे सदस्य,प्रतिनिधी यांचेही सहकार्य लाभले.








