शहादा l
शहादा तालुका पत्रकार संघाची वार्षिक बैठक विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बुधवारी घेण्यात आली. यावेळी संघाची नूतन कार्यकारिणी सर्वानुमते घोषित करण्यात आली. यात अध्यक्षपदी राजेंद्र अग्रवाल, उपाध्यक्षपदी बापू घोडराज तर सचिवपदी प्रा.नेत्रदीपक कुवर यांची सलग सातव्यांदा पुनर्निवड करण्यात आली.
गेल्या सात वर्षा पासून कार्यकारणी सदस्यांनी विश्वास दाखवून पुनश्च निवड केली.या निवडी बद्दल सर्व नुतन पदाधिका-यांचे अभिनंदन होत आहे.संघाचे ज्येष्ठ सदस्य तथा मार्गदर्शक प्रा. दत्ता वाघ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी गत वर्षभरातील पत्रकार संघाच्या कारकिर्दीचा आढावा घेण्यात आला. तसेच भविष्यातील उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी सर्वानुमते निवडण्यात आली. यांत अध्यक्षपदी राजेंद्र अग्रवाल, उपाध्यक्ष-बापू घोडराज, कार्याध्यक्ष-सुनील सोमवंशी, सचिव-प्रा. नेत्रदीपक कुवर, सहसचिव- हर्षल साळुंखे, कोषाध्यक्ष- योगेश सावंत, प्रवक्ता- हिरालाल रोकडे, कायम निमंत्रित तथा सल्लागार-प्रा. दत्ता वाघ,प्रा. रवींद्र पंड्या, प्रा.डी.सी.पाटील, कायदेशीर सल्लागार अॅड. राजेश कुलकर्णी तर सदस्यपदी अबरार खान, चंद्रकांत शिवदे यांची निवड करण्यात आली
.नूतन अध्यक्ष श्री.अग्रवाल यांनी निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले, सर्वसंमतीने व सर्व सदस्यांनी विश्वास दर्शवित माझी अध्यक्षपदी पुनर्निवड केली आहे. यापुढे वर्षभरात जनहिताचे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतील. सर्व निर्णय पदाधिकारी सदस्य व मार्गदर्शक यांच्याशी विचारविनिमय केल्यानंतर घेतले जातील.
पत्रकार संघातर्फे विविध प्रबोधनात्मक उपक्रम घेण्याचे नियोजन असल्याचेही श्री.अग्रवाल यांनी यावेळी सांगितले. सूत्रसंचालन प्रा. नेत्रदीपक कुवर यांनी केले तर आभार हर्षल साळुंके यांनी मानले.








