बोरद l प्रतिनिधी
बोरद येथे लम्पि आजाराच्या पार्श्वभूमीवर जनावरांचे लम्पि आजारापासून संरक्षण व्हावे या साठी गावात आज रोजी फवारणी करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की बोरद येथे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे.तत्पूर्वी बोरद परिसरात लाखापूर न्यूबन,लाखपूर येथे जनावरांमध्ये लम्पि सदृश्य लक्षणे आढळली होती.
ही लक्षणे दिसताच बोरद येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांनी आपल्या टिम सह परिसरातील जनावरांचे लसीकरण केले आहे तसेच आजही लसीकरण चालू आहे.आजपर्यंत सुमारे ४७०० जनावरांचे लसीकरण झालेले आहे.त्याचबरोबर करडे ,मालदा,लखापूर, न्यूबन, गोंडाळे, मोड,खरवड येथे फावरणीही करण्यात आली आहे.त्यामुळे वरील गावात हा आजार आटोक्यात आला आहे.
हा आजार बोरद गावात नाही तरीही बोरद गावाचे ग्रामविकास अधिकारी विजय पाटील यांनी असलेला धोखा ओळखून प्रशासकाच्या परवानगीने बोरद येथे संपूर्ण गावात फवारणी करण्याचे ठरवले आणि लागलीच कामाला सुरुवात ही केली आहे.यासाठी ट्रॅक्टर व टँकरच्या मदतीने फवारणी करण्यात येत आहे.यासाठी ग्रामपंचायतीचे लिपिक सतिश राजपूत ,मंगलसिंग गिरासे,संजय भिलाव, रवींद्र ठाकरे यांनी परिश्रम घेतले. होत असलेल्या फवारणीने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.