Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रत्येक हिंदू स्त्रीने रणरागिणी म्हणून सिद्ध व्हावे : रागेश्री देशपांडे

team by team
October 7, 2022
in राज्य
0
प्रत्येक हिंदू स्त्रीने रणरागिणी म्हणून सिद्ध व्हावे : रागेश्री देशपांडे

नंदुरबार | प्रतिनिधी

भारतामध्ये दिवसागणिक लव्ह जिहाद, महिलांवरील अत्याचार, बलात्कार, महिलांची छेडछाड यांसारख्या घटनांमध्ये  वाढ होत आहे. लव्ह जिहादमध्ये फसवून हिंदू युवतींचे धर्मांतरण करण्यात येत आहे, लव जिहादला फसलेल्या कित्येक युवतींचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. या संकटांचा बिमोड करण्यासाठी हिंदू युवतींना धर्मशिक्षण व स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे.

नवरात्रौत्सव हा महिषासुराचा वध करणार्‍या शक्तीरुपींनी दुर्गादेवीच्या उपासनेचा काळ आहे. प्रत्येक स्त्रीने या शक्ती तत्त्वाची आराधना करून, स्वतःतील शौर्य जागृत करणे आवश्यक आहे. आजही समाजामध्ये महिषासुराप्रमाणे अनेक असुरी प्रवृत्ती कार्यरत आहे,

प्रत्येक स्त्रीने महिषासुरमर्दिनी प्रमाणे त्याचा प्रतिकार करण्यासाठी धर्मचरणाने स्वतःतील देवीतत्व जागृत करणे आवश्यक आहे. आज देव,देश आणि धर्म रक्षणासाठी व हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी प्रत्येक हिंदू स्त्री ने झाशीची राणी व जिजामाते प्रमाणे रणरागिणी म्हणून सिद्ध व्हायला हवे, असे मार्गदर्शन हिंदू जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु.रागेश्री देशपांडे यांनी नवरात्र उत्सवात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानांमध्ये केले.
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे नवरात्र उत्सव मंडळांमध्ये या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.

या व्याख्यानाच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाचे महत्व, हिंदू धर्मात स्त्रीचे स्थान, सध्याची महिलांची सध्यस्थिती, पाश्चिमात्य संस्कृतीचे दुष्परिणाम, लव्ह जिहाद, धर्माचरण व स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या व्याख्यानानंतर  हिंदू राष्ट्रास्थापनेची सामूहिक शपथ सर्व ठिकाणी घेण्यात आली.

व्याख्यानानंतर अनेक महिलांनी सांगितले, हा विषय पुष्कळ महत्त्वपूर्ण आणि आवश्यक असल्याने सर्व महिलांना समजणे महत्त्वाचे होते. व्याख्यानंतर अनेक महिलांनी त्या भागांमध्ये धरनशिक्षण वर्ग व स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याची मागणी केली. अनेक मंडळांमध्ये गरबा कार्यक्रम सुरू होता तो थांबवून  सर्व महिला एकत्रित आल्या व बसून विषय ऐकून घेतला.

हे व्याख्यान मंडळांमध्ये व्हावे यासाठी त्या त्या भागातील हिंदुधर्मप्रेमी युवकांनी पुढाकार घेऊन, प्रसार आयोजन करत. महिलांना कुंकू लावण्याचे शास्त्र समजल्यावर सर्वांनी नियमितपणे कुंकू लावण्याचा निर्धार केला

बातमी शेअर करा
Previous Post

श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे जळगाव येथे ७ ते ९ ऑक्टोबरदरम्या विभागीय कृषि महोत्सव

Next Post

७ हजार ६४९ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

Next Post
७ हजार ६४९ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

७ हजार ६४९ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add