नंदुरबार l
शहादा शहरातील सप्तश्रृंगी माता मंदिर परिसरातून व नवापूर तहसील कार्यालयाच्या आवारातून अशा दोन ठिकाणाहून चोरट्यांनी दोन दुचाकी लंपास केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा येथील दशरथ सेना निकुंभ यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ एस ७६४०) शहादा शहरातील सप्तश्रृंगी माता मंदिर परिसरातून चोरट्याने चोरुन नेली.
तसेच नवोपूर येथील प्रितन प्रभाकर वसावे यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ ८९५०) नवापूर तहसील आवारातून चोरट्याने चोरुन नेली. याबाबत शहादा व नवापूर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३७९ प्रमाणे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.








