नंदूरबार l प्रतिनिधी
भाग्यचिंतन माध्यमिक विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत मोफत सायकल वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी श्री. शिंदे, पंचायत समिती नंदुरबार चे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, सहा.नियोजन अधिकारी श्री.सोनार, लायन फेमिना क्लबच्या रीजनल प्रेसिडेंट डॉ.तेजल चौधरी, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट शितल चौधरी तसेच विद्या विकास मंडळ संस्थेचे सचिव मधुकर पाटील, बलदाणे येथील सरपंच श्रीमती पाटील तसेच श्रीमती रुकारी उपस्थित होत्या.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते 14 लाभार्थी विद्यार्थीनींना सायकलचे मोफत सायकलचे वितरण करण्यात आले. यावेळी लायन फेमिना क्लब तर्फे आयोजित गांधी विचार निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. आजादी का अमृत महोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विजेत्या विद्यार्थ्यांना व NMMS परिक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.








