नंदुरबार l
शहादा तालुक्यातील उंटावद-होळ जवळील सुतगिरणी येथील युवकाचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील उंटावद-होळ सुतगिरणी येथील केशव राजेंद्र पटेल हा युवक घरी दवाखान्यात कामाला जातो, असे सांगून गेला.
मात्र अद्यापही घरी परतला नाही. याबाबत रविंद्र भटू पटेल यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.रमण वळवी करीत आहेत.








