नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील सर्व नागरिक व भाविकांना सूचित करण्यात येते की सालाबादप्रमाणे नंदुरबार शहरालगत साक्री नाक्याजवळ दसऱ्याच्या दिवशी श्री.नेताजी सुभाष बाबू मित्र मंडळा मार्फत रावण दहनचा कार्यक्रम घेण्यात येत असतो.
रावण दहन कार्यक्रमास काही सामाजिक संघटनांचा सदभावनांचा आदर ठेवून तसेच प्रशासनाचे कायदा व सुव्यवस्था हाताळनेस अडचणीचे ठरू नये त्याचा सन्मान ठेवून दि. ५ ऑक्टोंबर रोजी नियोजित रावण दहनचा कार्यक्रम हा अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आला आहे.
या बाबत श्री. नेताजी सुभाष बाबू मंडळाचे अध्यक्ष ईश्वर मोहनबापू चौधरी, उपाध्यक्ष राजेंद्र मच्छिंद्र चौधरी, रतीलाल मंगा चौधरी, भरत वासुदेव चौधरी, सुरेश सदाशिव घाटे, सुनील कांतीलाल चौधरी व मंडळाचे पदाधिकारी व सभासद यांनी कळवळे आहे.








