शहादा l प्रतिनिधी
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित जी.एम.चौधरी तंत्रनिकेतनचे प्रा. नितीन संतोष पाटील यांना सागर (मध्यप्रदेश) येथील स्वामी विवेकानंद विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे.
पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या जी.एम. चौधरी तंत्रनिकेतनचे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंगचे प्रा. एन. एस. पाटील यांनी स्वामी विवेकानंद विद्यापीठ सागर येथे ‘नोवेल टेक्निक टू आयडेंटिफाय स्टेबल अॅण्ड रिपीटेबल इन्फॉर्मेशन युजिंग इमेज फ्यूजन’ या विषया अंतर्गत पीएचडी साठी प्रबंध सादर केला होता.
स्वामी विवेकानंद विद्यापीठाकडून त्यांना पदवी प्राप्तीचे नुकतेच पत्र प्राप्त झाले असून त्यांच्या या यशाबद्दल मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील,शैक्षणिक व प्रशासकीय समन्वयक प्रा. मकरंद पाटील, तंत्रनिकेतनचे प्राचार्य बी.के. सोनी यांच्यासह विविध विद्या शाखेच्या प्राचार्यांनी अभिनंदन केले आहे.









