नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार ते खांडबारा रस्त्यावर नादुरूस्त ट्रॅक्टरला दुचाकी धडकून दोन युवकांचा मृत्यू झाल्याचा घटनेनंतर संतप्त जमावाने सदर ट्रॅक्टर ट्रॉलीला आग लावून जाळून टाकली होती. याप्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात २२ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार ते खांडबारा रस्त्यावर दोन दिवसापुर्वी नांदुरूस्त ट्रॅक्टरवर दोन दुचाकी धडकल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या संजय रोहिदास कोकणी, रवि उर्फ रविंद्र सुरूपसिंग कोकणी, अजय संजय कोकणी, सागर रमेश नाईक, विनोद दिलीप कोकणी इतर १५ ते १७ जणांनी सदर ट्रॅक्टर (क्र.एम.एच.३९-४९१८) आग लावून जाळून टाकुन नुकसान केले.
याबबात पोहेकॉ सुरेश वसावे यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात सुमारे २२ जणांविरूध्द भादंवि कलम ४३५, ४२७, १४३, १४७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरेश सोनवणे करीत आहेत.









