नंदूरबार l प्रतिनिधी

नंदूरबार जिल्ह्यांतील अक्कलकुवा, नवापूर, तळोदा, अक्राणी तालुक्यांमधील 206 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर ऐवजी आता 16 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. तर मतमोजणी 14 ऑक्टोबर ऐवजी आता 17 ऑक्टोबर रोजी होईल. अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.
अक्कलकुवा 45, नवापूर 81, तळोदा 55, अक्राणी 25 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर रोजी मतदान होणार होते. मात्र आता 16 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे, तर मतमोजणी 14 ऑक्टोबर ऐवजी आता 17 ऑक्टोबर रोजी होईल. अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.









