नंदूरबार l प्रतिनिधी
भारतीय जनसंघाचे आधारस्तंभ, अंत्योदय आणि एकात्म मानवतावादाचे प्रणेते, भाजपा कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान स्व.पंडित दीनदयाळ उपाध्यायजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन नवापुर भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावित यांनी अभिवादन केले.

यावेळी नगरसेवक गिरीष गावित, भाजपा अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख, जिल्हा महामंत्री राजेंद्र गावित ( राजुदादा ), तालुका सरचिटणीस जयंतीलाल अग्रवाल, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष हेमंत जाधव, शहर सरचिटणीस अजय गावित, जयवंत जाधव , शंभू सोनार, जितेंद्र मावची,गुमानसिंह महाराज, आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.









