नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील फुलसरे गावाजवळील शेतातील एका घरात 4 लाख 57 हजार 350 रूपयांचे बोगस किटकनाशक कृषि विभागाच्या पथकाने छापा टाकत जप्त केला आहे.याप्रकरणी एकाविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील फुलसरे गावाजवळील शेतातील एका घराच्या तळमजल्यावर कृषि विभागाच्या पथकाने छापा टाकला असता त्या ठिकाणी बोगस किटकनाशक आढळून आले.पथकाने तेथून Corazon २५० ml १४ नग, Corazon ५०० ml १८ नग, Tebuconazole ५० % + Trifloxystrobin २५ % SC २५० ml ५४ नग, Azoxystrobin २० % Difenoconazole १२.५ % SG ५०० ml २० नग, Thiophanate Methyl ७० % WP १००० gm २३ नग, Noralucon ५.२५ % +५०० Emamectin Benzoate ०.९ % ml SC ५०० ml ०५ नग असा एकूण 4 लाख 57 हजार 350 रूपयांचे बोगस किटकनाशक विक्री करण्याच्या उद्देशाने विनापरवाना साठा करून ठेवलेला आढळला.
पथकाने बोगस किटकनाशक जप्त केले आहे.याप्रकरणी नरेंद्र धरमदास पाडवी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलिस ठाण्यात मोहन जगन पटेल रा. फुलसरे. ता.नंदूरबार यांच्या विरुद्ध किटक कायदा १९६६ चे नाशक कलम ३ ( e ) , ९ , १३,१७,१८ , २० , २ १,२ ९ , ३० , व ३३ ( २ ) किटक नाशक नियम १ ९ ७१ चे नियम ६ , ९ , १०,१५,१६,१७ , १८ , १ ९ , ३७,३८ , ३ ९ , ४०,४१,४२,४३ , ४४ ( ३ ) पर्यावरण सरंक्षण का . १ ९ ८६ चे कलम ७ व ८ चे उल्लंघन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास असई पानाजी वसावे करीत आहेत.








