नंदुरबार l
तळोदा शहरातील रामगढ परिसरात अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तळोदा शहरातील रामगढ परिसरातील एका १३ वर्षीय मुलीस अज्ञाताने फूस लावून पळवून नेले. याबाबत मुलीच्या आईने तळोदा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रिया वसावे करीत आहेत.