नंदुरबार l प्रतिनिधी
अन्न सुरक्षा व मानके कायद्यातंर्गत सहायक आयुक्त संतोष कांबळे, अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार यांनी शहरातील शिवभोजन केंद्र, मार्केट यार्ड, नंदुरबार येथील अन्नपदार्थाच्या नमून्याची तपासणी करण्यात आली असून तेथील अन्न पदार्थाचे 2 नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणाकरीता पाठविण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे नेहरु चौक भागातील शिवभोजन केंद्रात देखील तपासणी करण्यात आली असून तेथील केंद्र चालकांना आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेबाबत मार्गदर्शक सूचनाचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले.
येत्या काळात जिल्ह्यातील सर्व शिवभोजन केंद्राच्या तपासणी करण्यात येणार असल्याने शिवभोजन केंद्राच्या चालकांनी नागरिकांना स्वच्छ व चांगल्या प्रकारचे जेवण द्यावे अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.








