Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

क्रीडा विषयक अनुदानासाठी प्रस्ताव सादर करावे

team by team
September 23, 2022
in राष्ट्रीय
0
क्रीडा विषयक अनुदानासाठी प्रस्ताव सादर करावे
नंदुरबार  l
शासनाच्या क्रीडा विभागांतर्गत व्यायामशाळा विकास योजना, क्रीडांगण विकास योजना, युवक कल्याण योजना अशा क्रीडा विषयक अनुदान योजना राबविण्यात येत असून या तीनही योजनेचा लाभ घेण्यासाठी 30 सप्टेंबर 2022 पर्यंत प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी केले आहे.
व्यायामशाळा विकास योजनातंर्गत नवीन व्यायामशाळा बांधकाम करणे, व्यायामशाळा इमारत नूतनीकरण (15 वर्ष जूनी असल्यास), व्यायामशाळा साहित्य खरेदी व खुले व्यायामशाळा साहित्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय शाळा, आश्रमशाळा, अनुदानीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व शासकीय कार्यालयानी प्रस्ताव सादर करावे.यासाठी कमाल 7 लाख इतके अनुदान मंजूर करण्यात येते.
क्रीडांगण विकास योजनेतंर्गत क्रीडांगण समपातळीत करणे, 200 ते 400 मीटर धावनपथ तयार करणे, क्रीडांगणास भिंतीचे, तारेचे कुंपण घालणे, विविध खेळांची एक किंवा अधिक प्रमाणात क्रीडांगणे तयार करणे, प्रसाधनगृह, चेंजींग रुम, पिण्याच्या व मैदानावर मारण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा निर्माण करणे,
भांडारगृह बांधणे, फल्ड लाईटची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे, क्रीडांगणावर मातीचा, सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी, आसन व्यवस्था तयार करणे, प्रेक्षक गॅलरी, आसनव्यवस्थेवर शेड तयार करणे, क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था तयार करणे, मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रिकलर यंत्रणा बसविणे, व मैदानावर रोलींगसाठी हँड मिनी रोलर खरेदी करणे इत्यादी बाबींसाठी 7 लाख रुपये कमाल मर्यादेत व क्रीडा साहित्य खरेदीसाठी 3 लक्ष अनुदान देण्यात येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी 100 टक्के अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा व शासकीय शाळांनी प्रस्ताव सादर करावे.
युवक कल्याण योजनातंर्गत ग्रामीण, नागरी भागातील नोंदणीकृत युवक मंडळांना आर्थिक सहाय्य तसेच नोंदणकृत युवक मंडळांना स्वंयरोजगार प्रशिक्षण शिबीरे, सामाजिक क्षेत्रात प्रशिक्षण शिबीर आयोजनासाठी 25 हजार कमाल मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येते. योजनेच्या अधिक माहितीसाठी व वरील सर्व घटकासाठी योजनानिहाय अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल परिसर, खामगांव रोड,नंदुरबार येथे उपलब्ध असून परिपूर्ण प्रस्ताव दोन प्रतीत आवश्यक कागदपत्रांसह सप्टेंबर 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत समक्ष सादर करावे.
बातमी शेअर करा
Previous Post

भजन-कीर्तनाचा त्रास होतो’ म्हणणार्‍या अधिकार्‍यांना मंदिर समितीतून हाकला

Next Post

अन्न व औषध प्रशासनामार्फत शिवभोजन केंद्राची तपासणी

Next Post
अन्न व औषध प्रशासनामार्फत शिवभोजन केंद्राची तपासणी

अन्न व औषध प्रशासनामार्फत शिवभोजन केंद्राची तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add